एका दिवसात ५-६ मृत्यू, रुग्ण बेडखाली, निकृष्ट दर्जाच्या सुविधा; जितेंद्र आव्हाड आक्रमक, अधिकाऱ्यांची कानउघाडणी
1859 views
thane चे व्हिडिओ सबस्क्राईब कराठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात गुरुवारी (१० ऑगस्ट) रात्री उशिरा भेट देत निकृष्ट दर्जाच्या आरोग्य सुविधेवरून तसेच रुग्णांची होणारी अतोनात हेळसांड पाहून आमदार जितेंद्र आव्हाडांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चांगलीच कानउघाडणी केली आहे. एकाच दिवसात या रूग्णालयात ५-६ जणांना आपला जीव गमवावा लागल्याने संतप्त झालेल्या आव्हाडांनी थेट रूग्णालय गाठून डाॅक्टर्सना चांगलंच सुनावलं. मी जुना जितेंद्र आव्हाड असतो तर कानफाडं लाल केली असती असं म्हणत सुमारे ५ तास मृतदेह आयसीयूमध्येच ठेवणार्या डाॅक्टरांना चांगलंच फैलावर घेतलं.