प्रवाशांचा रेटा एवढा की दार बंद न होताच एसी लोकल मार्गस्थ, ठाणे रेल्वे स्थानकातला व्हिडिओ व्हायरल!
1614 views
thane चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराज्यभरातील मुंबईमध्येही सकाळपासून पावसाच्या जोरदार धारा कोसळत आहेत.यादरम्यान मुंबई, ठाण्यासह रेल्वे रुळावर पाणी साचल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.एसी लोकलचे दरवाजे बंद झाल्याशिवाय लोकल मार्गस्थ होत नाही असं आपण नेहमी बघतो.मात्र ठाणे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झालेली असताना एसी लोकलमध्ये प्रवाशांचा रेटा पाहायला मिळाला.आधीच भरून आलेल्या लोकलमध्ये ठाण्यातूनही प्रचंड प्रवासी चढले.प्रचंड गर्दी असणारी एसी लोकल दरवाजे बंद न होताच कल्याणच्या दिशेने मार्गस्थ झाली.हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय.