५० आमदार आणि स्वतः उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजितदादांना बायकोसह केवळ तीन जागा, एकनाथ खडसेंचा टोला
1041 views
वाशिम चे व्हिडिओ सबस्क्राईब करामहायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला तीन ते चार जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अजित पवारांना टोला लगावला. एकनाथ खडसे म्हणाले की, शरद पवार यांच्यासोबत असताना अजित पवार यांना जी सन्मानाची वागणूक होती. तो सन्मान अजित पवार यांनी हरवला आहे. आज अजित दादांकडे ५० हून अधिक आमदार आहेत. ५० आमदार आणि स्वतः उपमुख्यमंत्री असतानाही त्यांना त्यांच्या बायकोसहित ३ जागांवर समाधान मानावे लागतेय. मला वाटतं हे चित्र बरोबर नाही, असा टोला एकनाथ खडसेंनी अजित पवारांना लगावला आहे.