'बिद्री'च्या निवडणुकीने काँग्रेसला होमपिचवर 'बूस्ट', सतेज पाटलांची ताकद 'महायुती'ला जड ठरणार!
1112 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकोल्हापूर.... पश्चिम महाराष्ट्रातील सहकार आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा.... गेल्या काही वर्षांत जिल्ह्यावर सतेज पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आपलं वर्चस्व ठेवलं... पण आता शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जिल्ह्यातलं राजकीय वातावरण बदललंय... भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विरोधक शिल्लक न ठेवण्याचा चंग बांधलाय. मात्र, भाजपसमोर विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांचं कडवं आव्हान असणार आहे. त्यात नुकत्याच झालेल्या बिद्री साखर कारखान्यात माजी आमदार के.पी. पाटील यांनी सत्ता राखण्यात यश मिळवलं. ज्या निवडणुकीनंतर आमदार सतेज पाटलांचे हात बळकट झाल्याचं बोललं जातंय... त्यात मुश्रीफ हे युतीत असल्याने भाजपला या लोकसभेत सतेज पाटील यांचाच धोका जास्त आहे. कोल्हापूरात नेमकं काय होऊ शकतं? सतेज पाटील यांची ताकद महायुतील जड जाणार का? तेच या व्हिडिओत पाहू.....