शिवसेनेतील निलंबनानंतर आमदार होऊन वचपा काढला, आता लोकसभेलाही निलेश लंके तेच करणार?
1357 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करा२७ फेब्रुवारी २०१७... उद्धव ठाकरे पारनेर दौऱ्यावर होते.. ठाकरेंच्या सभेत एका नेत्याने लेट एन्ट्री करून शक्तीप्रदर्शन केलं.. याच सभेनंतर गोंधळ झाला अन् शक्तीप्रदर्शानाच्या बदल्यात या नेत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.. निलंबनाचा बदला घेऊन हाच नेता पुढे आमदार झाला.. निलेश लंके असं या नेत्याचं नाव... शिवसेनेत झालेल्या खच्चीकरणाचा वचपा लंकेंनी आमदार होऊनच काढला.. मात्र, शिवसेनेत असताना जी वेळ आली तीच वेळ आल्याने लंकेंनी थेट विखे पाटलांना आव्हान दिलंय.. लोकसभेसाठी इच्छूक असलेल्या निलेश लंकेंचं विखेंसोबत नेमकं कुठं खटकलं, याचीच स्टेरी या व्हिडिओत पाहू.