पवारांसाठी मुंडेंची ऑफर नाकारली, पुतण्याचं बंड पण आव्हाड निष्ठावंत
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
साल १९९९. .जितेंद्र आव्हाडांच्या घरी एक फोन आला.. पलीकडून आवाज आला गोपीनाथ मुंडे बोलतोय.. मुंडे म्हणाले, जितेंद्र तुला विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचं मी आणि प्रमोदनं ठरवलंय. तुझं काय म्हणणं आहे ते पत्नी आणि सासऱ्यांशी बोलून ठरवं. पण आव्हाडांनी मेलो तरी पवारसाहेबांना सोडणार नसल्याचं सांगितलं आणि शरद पवारांसाठी मुंडेंची ऑफर नाकारली... आताही याच जितेंद्र आव्हाडांनी पवारांसोबतच आपली निष्ठा कायम ठेवलीय. पुतण्यानेही साथ सोडली मात्र शरद पवार बाप असल्याचं सांगणाऱ्या जितेंद्र आव्हाडांनी आपली निष्ठा पवारांशीच असल्याचं दाखवून दिलीय. शरद पवारांच्या याच निष्ठावंत शिलेदाराची स्टोरी नेमकी काय आहे तेच या व्हिडीओत पाहू...