कलेक्टरची हत्या केली, तुरुंगात राहून खासदार झाला, सुटकेसाठी कायदाच बदलला
1281 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करा५ डिसेंबर १९९४.. भररस्त्यात गोळ्या घालून एका कलेक्टरची हत्या झाली आणि बिहारच्या मुजफ्फरपूरच्या दहशतीची चर्चा देशात होऊ लागली.. अख्ख्या देशाला हादरवून टाकणारी ही हत्या करणाऱ्या टोळीत एका आमदाराचं नाव समोर आलं आणि बिहारच्या गुंडगिरीने कळस गाठला. आनंद मोहन सिंह असं या आमदाराचं नाव. कलेक्टरची भररस्त्यात हत्या करणारा हाच आनंद मोहन पुढे जेलमध्ये राहून खासदार झाला.. मात्र बिहार सरकारच्या एका निर्णयाने आनंद कुमारची सुटका झाली, त्याच्यासाठी सरकारने अख्खा कायदाच बदलून टाकला आणि दिवसाढवळ्या कलेक्टरची हत्या केलेल्या कुख्यात गुंडाला आणि नेत्याला अलगद बाहेर काढलं.. पण ज्याच्यासाठी सरकारने कायदा बदलला तो गुंड नितीश कुमारांसाठी एवढा महत्त्वाचा का आहे, बिहारमध्ये गुंडांसाठी कायदा का बदलावा लागला तेच या व्हिडीओत पाहू..