धनंजय मुंडेंच्या बंदोबस्ताची तयारी, परळीत करेक्ट प्लॅनिंग, पवारांनी तोडीस तोड मोहरा शोधला
1078 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराधनंजय मुंडे... असा नेता ज्याने शरद पवारांना दैवत मानून काका गोपीनाथ मुंडेंविरोधात राजकारण करण्याचं धाडस दाखवलं आणि भाजपविरोधी राजकारण सेट केलं. भाजपविरोधी राजकारणात धनंजय मुंडेंनी आपली छाप सोडत राष्ट्रवादीत स्थानही बळकट केलं.. परळीपासून वरळीपर्यंत भाजपविरोधी आवाज बुलंद केला आणि शरद पवारांसाठी बॅटिंग केली.. भाजपविरोधातल्या लढाईत शरद पवारांचा नाद करू नका असा नाराही दिला... पण राष्ट्रवादीतील फुटीत धनुभाऊंनी अजितदादांचं पारडं जड करत शरद पवारांशी वैर घेतलं.. आता याच धनंजय मुंडेंच्या बंदोबस्ताची जबाबदारी शरद पवारांनी घेतलीय. मुंडेंच्या बालेकिल्ल्यात पवारांनी डाव टाकलाय. धनंजय मुंडेंच्या तोडीस तोड मोहरा शोधलाय. पवारांनी धनंजय मुंडेंविरोधात कुणाला मैदानात उतरवलंय, तेच या व्हीडीओत पाहू....