विधानसभेला बंडखोरी, ठाकरेंना ताकद दाखवली, शिंदेंनी लोकसभेची उमेदवारी दिली
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
२०१९ ला हेमंत पाटलांनी जो मतदारसंघ जवळपास पावणे तीन लाखांच्या फरकाने जिंकला तिथेच २०२४ ला भाजपच्या दबावामुळे त्यांचा कार्यक्रम झाला आणि मुख्यमंत्र्यांना त्यानंतर नव्या दमाच्या नेत्याला मैदानात उतरवण्याची वेळ आली.. हेमंत पाटलांचा पत्ता कट होताच एकनाथ शिंदेंनी हिंगोलीत जाऊन सभा घेतली आणि कार्यकर्त्यांनी आला बाबुरावची घोषणाही केली.. हेमंत पाटलांचा पत्ता कापल्यानंतर बाबुराव कोहळीकरांना शिंदेंच्या सभेत जो प्रतिसाद मिळाला तो पक्षाची ताकद दाखवणारा होता.. एकेकाळी उद्धव ठाकरेंना ताकद दाखवणाऱ्या बाबुरावांची निवड एकनाथ शिंदेंनी नेमकी का केलीय आणि हिंगोलीतली लढत आता कशी अटीतटीची बनलीय तेच या व्हिडीओत पाहू..