सोपलांनी साथ सोडली, पवारांनी पर्याय शोधला, बार्शीसाठी उमेदवार ठरला!
1073 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करादिलीप सोपल… असा नेता ज्याने बार्शीला आपला बालेकिल्ला बनवलं आणि राजकारण सेट केलं. युतीची लाट असो की मोदी लाट.. बार्शीत फक्त सोपल पॅटर्न चालायचा. कधी शरद पवारांनी तर कधी बाळासाहेब ठाकरेंनी बार्शीत सभा घेऊनही निवडून येण्याचा रेकॉर्ड दिलीप सोपलांच्या नावे आहे.. पण २०१९ ला पवारांची साथ सोडल्याने वारं फिरलं आणि सोपलांना जबर हादरा बसला. विधानसभेला पराभव झालाच, शिवाय कारकिर्दीला ब्रेक लागला. आता याच सोपलांना पर्याय देण्यासाठी शरद पवारांनी नवी मोहरा शोधलाय. सोलापूर दौऱ्यावर जाताच पवारांनी बार्शीचा उमेदवार फिक्स केलाय. शरद पवारांनी दिलीप सोपलांना शोधलेला पर्याय कोण आहे, तेच या व्हीडीओत पाहू....