शिवसेना फुटीचं राष्ट्रवादीवर खापर, अजितदादा सत्तेचे वाटेकरी झाल्याने शिंदेंची कोंडी ?
1049 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करासासुमुळे वाटणी केली आणि आणि सासूच वाट्याला आली... मराठीतली ही म्हण परफेक्ट कुणाला लागू होत असेल तर ते आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड केलं आणि वेगळी चूल मांडली. पण शिवसेनेतून बाहेर पडताना एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादीवर खापर फोडलं आणि अजितदादांकडे बोट दाखवलं. राष्ट्रवादी शिवसेना संपवतेय, अजित दादांवर वर्चस्वाच्या राजकारणाचा आरोप आणि एवढंच काय तर माझ्या खात्याचा कारभार अजित दादाच करत असल्याचं सांगून शिंदेंनी महाविकासआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला... पण जेमतेम वर्षभरात पुलाखालून इतंक पाणी गेलं की एकनाथ शिंदेंना आपल्याच सरकारमध्ये अजितदादांना सामावून घ्यावं लागलं. अजित दादा उपमुख्यमंत्री झाल्याने एकनाथ शिंदेंची कशी कोंडी झालीय, तेच या व्हिडीओत पाहू.