धानोरकरांनी जिथे भाजपला हरवलं, तिथे मुनगंटीवारांनीही विजयाचा फॉर्म्युला शोधला
1116 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराचंद्रपूर.. महाराष्ट्रातला असा लोकसभा मतदारसंघ जिथे शिवसेनेतून येऊन एका नेत्याने असा विजय मिळवला जो काँग्रेसचा महाराष्ट्रातला एकमेव विजय ठरला.. काँग्रेसने ज्या मतदारसंघात दिवंगत बाळू धानोरकरांना तिकीट देणं टाळलं, त्याच मतदारसंघात धानोरकरांनी संधीचं सोनं केलं आणि ते जायंट किलर ठरले.. त्यांच्या निधनानंतर पत्नीनेही निवडणुकीत ताकद लावलीय आणि समोर आव्हान आहे ते मंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवारांचं.. लोकसभेत पराभव झाला तर परत पुनर्वसनासाठी संघर्ष अटळ आहे आणि त्यामुळे मुनगंटीवारांनी विजयासाठी चंद्रपुरात जे समीकरण असतं त्याची जुळवणी सुरु केलीय.. प्रतिभा धानोरकरांच्या विरोधात ज्या मतदारसंघात पंतप्रधान मोदींची सभा होतीय त्याच मतदारसंघात मुनगंटीवारांनी कशी बेरीज सुरु केलीय तेच या व्हिडीओत समजून घेऊ..