तीन दशकांपासून पवारांना साथ, वळसे पाटील दिल्ली गाठून पवारांचे हात बळकट करणार ?
1218 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअमोल कोल्हे.... रूपेरी पडदा गाजवल्यानंतर राजकारणाचा आखाडाही जिंकला. मातब्बर नेत्याला घरी बसवून संसदेत जाण्याचं स्वप्न पूर्ण केलं. पवारांनी ताकद दिली, सिनेसृष्टीतील प्रसिद्धीचा फायदा झाला आणि पहिल्याच झटक्यात कोल्हेंनी गुलाल उधळला... पण दिल्ली गाठूनही अमोल कोल्हेंच्या संघर्षाचा अंक संपायला तयार नाही.. अमोल कोल्हेंनी संसदेत राष्ट्रवादीचा एकने आकडा वाढवला, पक्षाला गळती लागली असताना राज्यभर झंझावाती प्रचार केला.. पण तरीही राष्ट्रवादी शिरूर लोकसभेसाठी भाकरी फिरवणार असल्याच्या चर्चा आहेत. कोल्हेंऐवजी शरद पवार आपले खास शिलेदार दिलीप वळसे पाटलांना लोकसभेच्या शिरूर रणांगणात उतरणार असल्याचं बोललंल जातंय. शिरूरमध्ये कोल्हेंचा पत्ता कट होणार का आणि झालाच तर वळसे पाटील भारी पडणार का तेच या व्हिडीओत पाहू....