काँग्रेस नेत्यांना मदत, अजित पवार गटाची चांदी पण पंकजा मुंडेंना मदत मिळेना
1054 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करागोपीनाथ मुंडेंनी वैद्यनाथ कारखान्याची उभारणी करून सहकार चळवळीचं नवं पर्व उभारलं. वैद्यनाथच्या यशानंतर गोपीनाथरावांनी अनेक सहकारी कारखान्याचं जाळ विणलं. अन् भाजपला संस्थानिक केलं.. पण ज्या गोपीनाथ मुंडेंच्या बळावर भाजपचे अनेक नेते सहकारात गब्बर झाले.. आता त्याच मुंडेंनी उभारलेल्या कारखान्याला भाजपची सत्ता असूनही मदत मिळत नाहीय. एकीकडे पंकजा मुंडेंच्या कारखान्याला शासकीय मदतीची नितांत गरज असताना सरकारने हात आखडते घेतलेत. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील अजित पवार समर्थकाच्या कारखान्यासाठी राज्य सरकारने मदत केलीय. अजित पवार गटाच्या नेत्याच्या कारखान्यासाठी राज्य सरकारने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली.. पण पंकजा मुंडेंच्या मदतीसाठी सरकारने कसे हात झटकलेत, याचीच माहिती या व्हीडीओत पाहू.