२०० गाड्यांचा ताफा, जाईल तिथे गर्दी, जरांगे पाटलांच्या झंझावाती दौऱ्यासाठी किती खर्च?
1923 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करामनोज जरांगे पाटील... अगोदर उपोषणाचं हत्यार उपसलं, मग सरकारला थेट जालन्यात येऊन निर्णय घ्यायला भाग पाडलं.. आणि आता वादळी झंझावाताने महाराष्ट्र पिंजुन काढतायंत... जवळपास २०० गाड्यांचा ताफा, जाईल तिथे तुफान गर्दी आणि भाषणातून समाजाचा पाठिंबा मिळवत एकट्या मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याची वज्रमूठ आणखी मजबूत केली. अनेकांनी मोर्चे काढले, आंदोलन केली.. आरक्षणाच्या लढ्यात कित्येकांचा जीवही गेला.. पण मनोज जरांगे पाटलांनी वेगळाच पायंडा सेट केला. दौऱ्याच्या माध्यमातून राज्यभर समाजाच्या एकीचा लढा तीव्र करणाऱ्या जरांगे पाटलांचा हा दौरा नेमका कशासाठी आहे, या दौऱ्यावर होणारा खर्च कसा केला जातोय तेच या व्हिडीओत पाहू..