भारताविरोधात बोलला की ठोकला, मोसादपेक्षाही थरारक कारवाया नेमक्या कुणाकडून?
1179 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअसं 'रॉ'सोबत काम केलेल्या माजी भारतीय गुप्तहेराचं वक्तव्य 'युरेशिया टाइम्स'ने आपल्या ११ जुलै २०२३ रोजीच्या वृत्तात प्रसिद्ध केलं होतं. कॅनडामध्ये भारताविरोधात मोर्चेबांधणी करणाऱ्या खालिस्तानीचा अज्ञातांनी खात्मा केल्यानंतर कॅनडाने भारतावर आरोप केले आणि जगभरात होणाऱ्या गुप्त कारवायांसह भारताच्या शत्रूंवर होणाऱ्या कारवायाही चर्चेत आल्या.. परक्या देशात त्यांच्याच भूमीवर जाऊन आपल्या देशाच्या शत्रूला ठोकण्यासाठी आतापर्यंत अमेरिकेची सीआयए आणि इस्रायलची मोसाद या संस्था प्रसिद्ध होत्या. कोणतीही गुप्त कारवाई ज्याला गुप्तहेरांच्या भाषेत Covert Operation असंही म्हटलं जातं त्याची जबाबदारी कधीच कोणत्या देशाकडून घेतली जात नाही आणि फक्त आरोप होत राहतात. पण कॅनडामध्ये ज्या पद्धतीने भारतविरोधी व्यक्तीची हत्या झाली, तसं आधी कोणत्या देशात झालंय का? आणि झालं असेल तर भारताची त्यावर प्रतिक्रिया काय होती? मोसादसोबत रॉची तुला का केली जातेय त्याचीच काही उदाहरणं या व्हिडीओत पाहू..