तुरुंगात टाकलं, दिल्लीत नेऊन एकटं पाडलं, पण काँग्रेस एक नेता अख्ख्या भाजपला पुरुन उरला
1453 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराडीके शिवकुमार.. काँग्रेसचा असा नेता जो पक्षाच्या पडझडीच्या काळात प्रत्येक ठिकाणी खंबीरपणे उभा राहिला, भाजपला भिडला, तुरुंगावसही भोगला, पण २०२३ ची वाट पाहिली आणि सगळा हिशोब चुकता केला. पक्षातून फुटलेल्या आमदारांना थेट मुंबईत येऊन धमकावणाऱ्या डीके शिवकुमार यांना २०१९ मध्ये तुरुंगात जावं लागलं, पण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिवकुमार पेटून उठले आणि भाजपविरोधात रान पेटवलं.. आमदार फुटल्यानंतर पक्षाचा झालेला अपमान, तुरुंगात टाकल्याचा बदला आणि गावखेड्यातले मुद्दे पकडून भाजपचा हिशोब चुकता करणाऱ्या शिवकुमार यांची स्टोरीच या व्हिडीओत पाहू..