२६ वर्षीय पदवीधर बेरोजगार 'बर्रेलक्का' तेलंगणात फेमस, बीआरएस अन् काँग्रेसच्या उमेदवाराचं टेन्शन वाढलं
2616 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकर्ने शिरीषा.... तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीला उभी राहिलेली २६ वर्षांची अपक्ष उमेदवार... वाणिज्य शाखेतून ती पदवीधर पण तिचं आयुष्य अनेक समस्यांनी भरलेलं आहे... कुटुंबात शिक्षण घेणारी ती पहिलीच व्यक्ती आहे पण नोकरी न मिळाल्याने म्हशी चरायला नेणं हेच तिचं एकमेव काम... कर्ने शिरीषाने म्हशी चरायला नेल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि ती अचानक 'बर्रेलक्का' या नावाने सगळीकडे फेमस झाली... 'बर्रेलक्का' शब्दाचा मराठीत अर्थ होतो 'म्हशींची बहिण'. साधी राहणीमान, बँक बॅलन्स केवळ साडे सहा हजार असलेल्या या बार्रेलक्काला मिळत असलेल्या प्रतिसाधाने तेलंगणातील भल्याभल्यांना घाम फोडलाय... कर्ने शिरीषा नेमकी कोण आहे? 'बर्रेलक्का' नावामागचा नेमका किस्सा काय? निवडणुकीतल्या मुद्दाने तेलंगणात कसं रान पेटलंय आणि बीआरएस अन् काँग्रेसच्या उमेदवाराचं कसं टेन्शन वाढलंय? तेच या व्हिडिओत पाहू.... नमस्कार मी विश्रांती....