वसुंधराराजे-दिया कुमारींवर भारी पडले, देशात चर्चेत असलेले राजस्थानचे नवे CM भजनलाल शर्मा आहेत कोण?
1236 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराभाजप प्रचंड महत्त्वकांक्षी पक्ष... प्रसंगी कुठलेही कठोर निर्णय घेऊन, राजकीय लवचिकता दाखवून भाकरी फिरविण्यासाठी माहिर... मोदी शहांनी अशीच भाकरी म. प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये फिरवली. तोच कित्ता त्यांनी राजस्थानमध्ये गिरवलाय. भाजपच्या गडातून भजनलाल शर्मा यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवलं, जोरदार प्रचार केला आणि पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या भजनलाल यांच्या गळ्यात चक्क मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली. भाजपच्या या आश्चर्यकारक निर्णयाने संपूर्ण देश चकित झालाय. भजनलाल शर्मा आहेत तरी कोण? आणि अशी काय कारणे आहेत, ज्यामुळे भाजपने त्यांना थेट मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवलंय, तेच आपण या व्हिडीओत पाहू...