१०० कोटींचं घबाड, किलोंमध्ये सोनं, नोटा मोजताना थकल्या मशिन, ACB च्या १४ पथकांकडून काम तमाम
1152 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकाँग्रेसचे खासदार धीरज प्रसाद साहू... ज्याचं नाव गेल्या महिन्यात सामान्यांपासून राजकीय नेत्यांमध्ये चर्चेत होतं. ज्यांच्या घरातून आयकर विभागाने ३५१ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आणि जप्त केलेल्या रोख रकमेचा आकडा मोजताना पैसे मोजण्याच्या ३ डजन मशिन्स थकल्या होत्या... त्यांच्या नावाची चर्चा थांबते ना थांबते तोच तेलंगणातील एका अधिकाऱ्याच्या घरी १०० कोटींचं घबाड, किलोमध्ये सोनं आणि मिळालेलं काळं धन पाहून एसीबीचे अधिकारीही हैराण झालेत. एसीबीच्या पथकाने ज्या अधिकाऱ्याच्या घरावर छापा मारले त्यांचं नाव आहे एस बालकृष्ण... एस बालकृष्ण यांच्या घरावर छापा मारल्यानंतर नेमकी किती रक्कम आणि काय काय मिळालं? एसीबीच्या १४ पथकांकडून कारवाई करण्यात आलेला हा 'कुबेर' अर्थात एस. बालकृष्ण नेमके कोण आहेत? या कोट्यवधींच्या बेहिशोबी मालमत्तेचे पुढे काय होतं? तेच या व्हिडिओत पाहू.....