संजय राऊत पहिल्यांदाच निवडणूक लढणार, एका दगडात दोन पक्षी मारण्याची तयारी सुरु
1064 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करा२०१४ पूर्वी आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करून किरीट सोमय्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला सळो की पळो करू सोडलं.. पण २०१७ ला मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भाजप शिवसेना आमनेसामने येताच सोमय्यांनी आपला मोर्चा ठाकरेंकडे वळवला. थेट ठाकरे कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.. उद्धव ठाकरेंना बांद्रा माफिया म्हणत रान पेटवंल. मात्र, त्यानंतरही शिवसेना-भाजप एकत्र सत्तेत राहिले. पण यात बळी गेला तो किरीट सोमय्यांचाच. २०१९ ची लोकसभा निवडणूक आली आणि उद्धव ठाकरेंना नडणाऱ्या किरीट सोमैय्यांना घरी बसावं लागलं.. आता याच किरीट सोमय्यांच्या मतदारसंघातून संजय राऊत मैदानात उतरणार आहे. किरीट सोमय्यांच्या होमपीचवरच संजय राऊतांनी नव्या लढाईला कशी हाक दिलीय, तेच या व्हिडीओत पाहू..