दोन वेळा तयारी करूनही अपयश, आता थेट मातोश्री गाठली, कट्टर समर्थकाने अजित दादांचं टेन्शन वाढवलं
1152 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करापुणे आणि पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो... पण बालेकिल्ल्यातूनच अजित पवार यांना धक्का देणारे संकेत समोर आलेत... दोन वेळा तयारी करूनही अजित पवार यांनी लोकसभेची उमेदवारी न दिल्याने आता यंदा तरी संधी हुकायला नको म्हणून अजित पवार यांच्या कट्टर समर्थकाने थेट 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीने पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात एकच खळबळ उडालीये. त्यामुळे ठाकरेंचे हात बळकट केले तर अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असेल. पण अजित पवारांचा हा शिलेदार नेमका कोण आहे? पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात त्याची ताकद काय आहे? ठाकरेंची भेटीमुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीआधीच अजितदादांसह शिंदे गटाचं कसं टेन्शन वाढलंय तेच या व्हिडिओत पाहू.....