पहिली यादी जाहीर, पण उमेदवार शोधण्यासाठी ४ मतदारसंघात अजूनही पवारांची दमछाक
1036 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करापक्ष फुटल्यानंतर शरद पवार पहिल्याच मोठ्या निवडणुकीला सामोरे जातायत आणि पहिली यादी जाहीर केली असली तरी उर्वरित मतदारसंघात कशी दमछाक होतेय ते महाराष्ट्रातल्या चार मतदारसंघातलं चित्र सांगतंय.. कारण, माढ्यात जातीय समीकरण जुळवण्यासाठी निघालेल्या पवारांना महादेव जानकरांनी खो दिला आणि अजित दादांच्या कोट्यातली परभणीची जागा पदरात पाडून घेतली... तिकडे बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या विरोधात मराठा उमेदवार देण्यासाठी ज्योती मेटे या पवारांच्या उमेदवार असतील बोललं गेलं आणि मेटेंनी फडणवीसांची भेट घेऊन या चर्चांना पूर्ण विराम दिला.. एकीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा कायम आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीला काही मतदारसंघात उमेदवार निवडताना पवारांना कशी कसरत करावी लागतेय... याशिवाय पवार हे उमेदवार निवडताना कशी समीकरणं जुळवतायत त्याचा पाच मतदारसंघातला ग्राऊंड रिपोर्ट पाहू...