नाशिकचे ६ आमदार नेले, पण पवारांनी शेरास सव्वाशेर शोधले, अजितदादांचं टेन्शन वाढलं!
1015 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करानाशिक... पवारांचा बालेकिल्ला राहिलेला जिल्हा... राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवार यांनी इगतपुरी ते येवल्यापर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर जिल्ह्यात नव्या जोमाने पक्षबांधणीला प्रारंभ केलाय... पदाधिकाऱ्यांशी ‘वन टू वन’ चर्चा करीत नवीन ‘टीम’ बांधणीला त्यांनी वेग दिलाय... ‘पुलोद’च्या प्रयोगादरम्यान याच जिल्ह्यातून एकाच वेळी १४ आमदारांची पवारांना साथ मिळाली होती. सद्यस्थितीत जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत. त्यात अजितदादांच्या बंडानंतर छगन भुजबळांसह जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी अजितदादांना साथ दिलीये. पवारांना एका दौऱ्यानंतर जिल्ह्यात कसं वारं फिरवलंय आणि आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत नाशिकमधल्या सहा मतदारसंघात नेमकी काय स्थिती असेल, तेच या व्हिडिओत पाहू......