शरद पवारांचे विश्वासू बनले, सुरेश कलमाडींना भिडले, पुण्यात खासदारकीला मानकरांनी शड्डू ठोकला!
1089 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराज्याचं दादा व्यक्तिमत्व अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांचा धुरळा खाली बसत नाही तोच त्यांच्या दोन तगड्या साथीदारांच्या खासदारकीच्या चर्चा पुण्याच्या नाक्या नाक्यावर सुरु आहेत. गिरीश बापटांच्या निधनानंतर पुण्याचा पुढचा खासदार मीच होणार, अशा वल्गना अजितदादांच्या दोन सहकाराऱ्यांनी केल्यात. एक प्रशांत जगताप तर दुसरे कायम चर्चेत असणारे दीपक मानकर... ज्यांनी काँग्रेसचे एकेकाळचे बॉस सुरेश कलमाडींना नडायला देखील मागेपुढे पाहिले नाही. मानकर शरद पवार आणि अजितदादांचे विश्वासू कसे बनले? सुरेश कलमाडींना का भिडले आणि खरंच त्यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी मिळू शकते का? तेच आपण या व्हिडीओत पाहू....