१९९९ च्या घटना दुरूस्तीचा निर्णय पथ्यावर पडला, शिंदेंनी ठाकरेंचा डाव उधळला
1095 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशिवसेनेच्या फुटीनंतर अखेर दीड वर्षांनी शिवसेनेतील सत्ता संघर्षाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला... शिवसेना कुणाची यावर विधानसभा अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केलंय. शिंदे गटावरील अपात्रतेची कारवाई तर टळलीच शिवाय खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता मिळालीय... तर पक्ष हातून निसटला असला तरी ठाकरेंच्या १४ आमदारांचं सदस्यत्व कायम राहिलंय. ठाकरे गटाच्या नेत्यांची आमदारकी वाचली असली तरी पक्षाचा ताबा आपल्या हाती ठेवण्यात ठाकरेंना अपयश आलं. दोन्ही गटांकडून कायदेशीर लढाईत लढण्यात कसलीच कसर सोडली नव्हती. मात्र, कायदेशीर लढाईची झुंज जिंकत शिंदेंनी बाजी मारली.. पण पक्ष प्रमुख असूनही ठाकरेंच्या हातून शिवसेना कशी निसटली? १९९९ च्या घटनादुरुस्तीच्या एका निर्णयामुळे ठाकरेंचं कसं नुकसान झालंय? तेच व्हिडीओत पाहू....