पवारांनी परफेक्ट कार्यक्रम केला, रावेरमध्ये भाजपातलाच नाराज नेता उतरवला
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
उद्धव ठाकरेंनी भाजपचाच नेता फोडून जळगावमधून त्याला तिकीट दिलं.. पवारांनीही रावेरमधून ठाकरेंसारखंच नियोजन केलं आणि भाजपातल्याच नाराज नेत्याला तिकीट देण्याची तयारी सुरु केली, पण त्यातच पवारांसाठी रावेरमध्ये ताकद असलेले एकनाथ खडसेच पुन्हा भाजपात जाण्याचं निश्चित झालं आणि पवारांची अडचण वाढली.. पण जळगावचा फॉर्म्युला रावेरमध्येही वापरला आणि पवारांनी भाजपातलाच नेता आणून रावेरमधून रक्षा खडसेंविरोधात मैदानात उतरवला.. भाजपातून येऊन पवारांसाठी मैदानात उतरलेला नेता नेमका कोण आहे आणि रावेरमध्ये आतापर्यंत होणारी एकतर्फी लढत यावेळी कशी चुरशीची बनू शकते तेच या व्हिडीओत पाहू..