पुतण्याचे वार, नातू झाला ढाल; राष्ट्रवादीच्या पडझडीतून रोहित पवार घेणार फिनिक्स भरारी?
1059 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअजित दादांच्या बंडानंतर रोहित पवारांनी हे ट्वीट केलं अन् आपले मनसुबे स्पष्ट केले. सख्ख्या पुतण्यासह विश्वासू सहकाऱ्यांनी शरद पवारांची साथ सोडली असताना शरद पवार या आश्वासक चेहऱ्याची साथ रोहित पवारांनी बंडानंतर क्षणभरासाठीही सोडली नाही. पत्रकार परिषद असो, साताऱ्याचा दौरा किंवा मग शरद पवारांच्या कारमध्ये फ्रंटसीवर बसून मुंबईत येणं असो, शरद पवारांसोबत रोहित पवार सावली सारखे उभे राहिले. अजित पवारांच्या बंडानंतर रोहित पवार यांची प्रतिमा झळाळून निघाली, खंबीरपणे ताकद देणारे रोहित पवार यांनाच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आश्वासक नेतृत्व म्हणून आपली जागा निर्माण करण्याची संधी चालून आलीये. रोहित पवारांना शरद पवारांकडून कशी ताकद मिळू शकते, रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं आश्वासक नेतृत्व कसे ठरु शकतात तेच या व्हिडिओत पाहू...