काँग्रेसविरोधात लढून आमदारकी मिळवली, मग भाजपला टक्कर दिली, पण काँग्रेससाठी संकटमोचक ठरलेला नेताच अडचणीत
1857 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करासाल १९९५... या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत अनेक प्रस्थापित काँग्रेसच्या घराण्यातील तरूणांनी बंड करून काँग्रेसलाच आव्हान दिलं. त्याचवेळीच नागपूर जिल्ह्यातील अशाच एका तडफदार युवा नेत्यानेही काँग्रेसला सोडचिट्ठी देत अपक्ष लढून आमदारकी मिळवली. हा नेता म्हणजेच सुनिल केदार.. अपक्ष निवडून आल्यानंतर सुनिल केदार यांनी शिवसेना पक्षाला पाठिंबा दिला अन् राज्य मंत्री पदही मिळवलं. मात्र पुढे वारं फिरताच सुनिल घरवापसी करून सुनिल केदार काँग्रेसमध्ये परतले ते कायमचेच. २०१४ नंतर देशासह महाराष्ट्रात काँग्रेसची धुळधाण उडाली असताना सुनिल केदारांनी विदर्भात शर्थीने काँग्रेसची खिंड लढवली.. मात्र, काँग्रेससाठी संकटमोचक ठरलेले सुनिल केदारच खुद्द संकटात सापडलेत.. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी दोषी आढळल्यानंतर सुनिल केदारांची आमदारकी रद्द झालीय.. राजकीय वादळवाऱ्यात नागपुरात काँग्रेसला सावरणाऱ्या सुनिल केदारांची नेमकी स्टोरी काय आणि ते कशामुळे अडचणीत आलेत? व्हिडिओत पाहू....