विरोधकांवर चौफर हल्ला करणारी सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत
1268 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा कॅफे या विशेष कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीच्या नेत्यांवर चौफेर हल्ला केला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कवितेच्या माध्यमातून टीकेचे बाण सोडले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांना घेरण्याची एक संधी सोडली नाही. पूजा तडस प्रकरणात रामदास तडस यांनी यांनी केलेल्या आरोपावर उत्तर दिले. तर राज्यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळतील याचा अंदाजही व्यक्त केला. पाहा संपूर्ण मुलाखत -