काका पुतण्याच्या खेळीने ठाकरे सावध, एकजुटीने काँग्रेस सोबतीला, २०२४ ची स्ट्रॅटजी काय?
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
१२ ऑगस्ट २०२३... राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांची पहिल्यांदाच पुण्यात गुप्त भेट झाली आणि महाविकास आघाडीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. काका-पुतण्याच्या भेटीवर काँग्रेस आणि ठाकरे गटाने उघडपणे नाराजी व्यक्त केली. आगामी काळात भाजपचा मुकाबला करण्यासाठी महाविकास आघाडी मजबूत ठेवण्याचं आव्हान असताना शरद पवार यांनी भाजपसोबत जाणार नाही असं जरी म्हटलेलं असलं तरी राजकारणात काहीही घडू शकतं. साहजिकच महाविकास आघाडीचे भविष्यही काहीसे धोक्यात आल्याच्या चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादीच्या आतापर्यंतच्या संशयास्पद भूमिका पाहता तिकडे मातोश्री बंगल्यावर उद्धव ठाकरे यांच्या काँग्रेस नेत्यांसमवेत बैठका सुरु आहेत. आत्ताचं राजकारण पाहता स्बबळावर लढण्याची वेळ आलीच तर ठाकरे काय करु शकतात? ठाकरे गट आणि काँग्रेसच्या बैठकीमध्ये नेमकं काय सुरु आहे? आगामी काळात ठाकरे शरद पवारांशिवाय 'पॉवर' दाखवणार का? तेच या व्हिडिओत पाहू.....