एकेकाळच्या पीएला गृहमंत्री केलं, राजकारण सेट करूनही वळसे पाटलांनी पवारांची साथ सोडली
1064 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करादिलीप वळसे पाटील.. असा नेता ज्याला पवारांनी बोटाला धरून राजकारणात आणलं. शरद पवारांचा शब्द प्रमाण मानून राजकारण करणाऱ्यांमध्ये वळसे पाटलांचा समावेश व्हायचा. अजित दादांनाही डावलून पवारांनी दिलीप वळसे पाटीलांची महत्वाच्या पदी वर्णी लावलीय.. पण अखेर वळसे पाटलांनीही पवारांची साथ सोडलीच. सावली झालेल्या नेत्यानेच अडचणीत आणल्याने पवारांच्या पदरी निराशा आलीय. राजकारणात संधी अन् सत्तेचे दिवस दाखवले तरीही वळसे पाटलांनी राजकीय वादळवाऱ्यात पवारांची साथ सोडली. पवारांच्या बोटाला धरून राजकारण केलं पण वळसे पाटलांनी पवारांची कशी निराशा केली, तेच या व्हिडीओत पाहू.