मनोमिलनाची बैठक अटींनी गाजली, अभिजीत पाटलांची तडकाफडकी एक्झिट चर्चेचा विषय ठरली!
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
अभिजीत पाटील.... आधी उद्योजक मग महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचं अर्थकारण हाताच्या करंगळीवर फिरवणारा युवा तरुण... पाटलांनी सुरुवातीला वाळूच्या ठेकेदारीतून व्यवसाय केला. आता साखर कारखान्याच्या निवडणुकीतून राजकारणात एंट्री केल्यानंतर त्यांना आमदारकीचीही स्वप्न पडू लागली आहेत. अशातच २०२४ साठी पंढरपूर मतदारसंघात तगडी फिल्डिंग लागलेली असताना अभिजीत पाटील पुन्हा एकदा चर्चेत आलेत ते पंढरपूर बाजार समितीच्या निवडणूक बैठकीमुळे. मनोमिलनासाठी कल्याणराव काळे, भगीरथ भालके आणि अभिजीत पाटलांनी बैठक बोलावली खरी...पण त्याच बैठकीतून अभिजीत पाटलांची तडकाफडकी एक्झिट कशी चर्चेत आलीये आणि बाजार समिती निवडणुकीचं गणित नेमकं काय?? तेच या व्हिडिओत पाहू......