CM Mamata Banerjee go solo in LS polls : BJP भुईसपाट करण्यासाठी ममता दीदींचा Rahul Gandhi यांना झटका
1198 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराममता बॅनर्जी.... पश्चिम बंगालची कन्या आणि राज्याची 'दिदी'.... २६ वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम केल्यानंतर स्वतंत्र जाण्याचा विचार करत १ जानेवारी १९९८ ला ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना केली. पक्षाच्या अध्यक्षा ते राष्ट्रीय पक्षाच्या नेत्या अशी ओळख मिळवली... २०१६ मध्ये निवडणूक आयोगाकडून पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आणि संसदेत तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनला... १९९८ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पक्षाचे अवघे ७ उमेदवार निवडून आले तोच पक्ष २००१ मध्ये काँग्रेस पक्षाशी युती करत ६० जागांवर विजय मिळवत प्रमुख विरोधी पक्ष बनला. पुढे २००४ आणि २००६ ला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेले नुकसान पाहून एनडीए सोडण्याचा निर्णय घेतला आणि २०११ ते २०२१ अशा दहा वर्षांमध्ये सलग विजय मिळवत ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली... २०२१ च्या निवडणुकीमध्ये संपूर्ण शक्ती लावूनही भाजपला बंगालमध्ये सत्ता स्थापन करता आली नाही. आणि आता इंडिया आघाडीमध्ये सदस्य असताना ममता बॅनर्जी यांनी थेट लोकसभेच्या सगळ्या जागा स्वबळावर लढण्याचा निर्धार केलाय....ममता बॅनर्जी नेमकं काय म्हणाल्या? लोकसभा निवडणुकीत जास्त जागा जिंकण्याच्या काँग्रेसच्या इराद्याला कसा धक्का बसलाय? आणि पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या जागांचं गणित काय आहे? तेच या व्हिडिओत पाहू.....