अर्रर्रर्रर्र... पगार झाल्याच्या आनंदात तळीरामाचा प्रताप; दोन दिवस थेट गटारीच्या पाइपमध्ये दोन वास्तव्य
Curated by Mayuri Sarjerao|TimesXP Maharashtra|25 May 2023
दारूच्या नशेत कोण काय करेल याचा नेम नाही. मात्र बेळगावात एका तळीरामाने आगळावेगळाच प्रताप केला आहे. पगार झाल्याच्या आनंदात एवढी दारू प्यायली की थेट गटारालाच घर बनवलं. बेळगावातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर असलेल्या एका गटारात एक महाशय अडकल्याचे आज काही नागरिकांना दिसून आले. फुटक्या व दुर्लक्षित गटारात हे महाशय दोन दिवसांपासून दारूच्या नशेत गटाराच्या पाईपमध्ये राहिला. हा इसम इतकी दारू प्यायला होता की त्याला काही समजत नव्हते. तब्बल दोन दिवस हे महाशय या गटारात पडून होते आणि आज नशा उतरल्यानंतर बाहेर येण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होते. हे पाहून येथील काहींनी समाजसेवकांना याबाबत कळविले अणि समाजसेवकांनी तत्परतेने घटनास्थळ गाठून या दारुड्या महाशयाला सुरक्षित बाहेर काढले.गटारात राहिल्याने त्याचे कपडे आणि शरीर घाणीने बरबटून गेले होते. त्याला बाहेर काढून गटाराशेजारीच त्याला थंड पाण्याची आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात उपचारांसाठी पाठवून देण्यात आले.तळीराम मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याचे समोर आले.