भाजपने निवडणुकीपूर्वीच खातं उघडलं, गुजरातमध्ये पहिला खासदार बिनविरोध विजयी
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लोकसभा निवडणुकीचं मतदान व्हायच्या आधीच भाजपने गुजरातमध्ये पहिला विजय नोंदवला आहे. सुरत मतदारसंघाचे भाजप उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यानंतर भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक आयोगाकडून त्यांच्या विजयाची घोषणा केली जाणार आहे. सुरतमध्ये एक दिवस आधी काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द झाल्याने समीकरणे बदलली होती. बसपाचे उमेदवार प्यारे लाल भारती यांनी अर्ज मागे घेतला. मुकेश दलाल हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. दलाल हे सुरतच्या इतिहासात बिनविरोध निवडून आलेले पहिले खासदार ठरले आहेत.