लंडनमध्ये मराठीतून ख्रिसमस कॅरल्सचं गायन, लंडनस्थित महाराष्ट्रीयन मंडळींनी आनंद लुटला
1546 views
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
ख्रिसमस एका आठवड्यावर येऊन ठेपला आहे आणि त्याचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी कॅरल्स म्हणजेच ख्रिसमसच्या गाण्यांचे आयोजन केले जातं. लंडनमधील पॅडिंग्टन या ऐतिहासिक रेल्वे स्टेशनवर इंग्लंडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्थायिक असलेल्या मराठी ख्रिश्चन मंडळींनी ख्रिसमस कॅरल्सचे आयोजन केलंय. गेल्या ५ वर्षांपासून प्रशांत आणि माधुरी कुलकर्णी यांच्याकडून या उपक्रमाचं आयोजन केलं जात आहे. यावर्षी या कॅरल्समध्ये जवळपास ८० लोक सहभागी झाले होते.
nationalTimesXP MarathiUpdated: 20 Dec 2023, 8:33 pm