आजोबा चहा पित होते, अचानक खिशातल्या मोबाईलने पेट घेतला, दणादणा उड्या मारल्या, नशीब आग विझली
1093 views
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकेरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आलीये. शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाईलचा स्फोट होऊन अचानक आग लागल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल होतोय.हॉटेलमध्ये चहा घेत बसलेल्या वृद्धाच्या खिशात मोबाईल फोनने पेट घेऊन स्फोट झाल्याची घटना घडली आणि परिसरात चांगलीच खळबळ उडाली. इलियास असं या ७६ वर्षीय वृद्धाचे नाव आहे. यावेळी त्यांच्या खिशातील मोबाईल फोनने अचानक पेट घेऊन त्याचा स्फोट झाल्याने ते चांगलेच हादरले. स्फोटाचा आवाज ऐकताच इलियास यांनी खिशातील फोन काढून जमीनीवर फेकला. मात्र या दरम्यान त्यांच्या शर्टाने पेट घेतला होता. हॉटेलमधील व्यक्तीने वेळीच धाव घेतली आणि स्फोट झालेल्या फोनवर पाणी ओतून आग विजवली. शिवाय इलियास देखील थोडक्यात बचावले.