आईनं कष्टानं वाढवलं, कृतज्ञता म्हणून मुलानं जीवंतपणीच आईचा संगमरवरी पुतळा उभारला
1142 views
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब करातामिळनाडूतील नमक्कल कुलीपट्टीतील रहिवासी असलेला प्रभू यानं जागतिक पालक दिनानिमित्त त्यांच्या आईचा दीड लाख किमतीचा संगमरवरी पुतळा उभारून बालपणीचे स्वप्न पूर्ण केलंय. प्रभूच्या वडिलांचे लहानपणीच निधन झालं. त्यानंतर त्याच्या आईनं दुसऱ्यांच्या घरी घरकाम करून प्रभू आणि त्याच्या धाकट्या बहिणीला मोठ्या कष्टाने वाढवलं. आपल्या आईच्या कष्टाची जाणीव ठेवून प्रभूनं स्वतः कष्टानं आता वेल्डिंग वर्कशॉप उभं केलं आहे. मात्र आपल्या आईनं केलेले कष्ट आणि तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रभूनं आईचा संगमरवरी पुतळा उभारला. मुलानं केलेल्या या कृतीमुळे आई देखील भारावून गेलीये अन् मुलांवर केलेले संस्कार आणि त्यांच्यासाठी उपसलेल्या कष्टाचं चीज झाल्याचे भाव या माऊलीच्या चेहऱ्यावर उमटले आहेत.