इन्कम टॅक्सबाबत कोणताही बदल नाही, अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा
1046 views
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. सर्वसामान्यांचं लक्ष लागून राहिलेल्या कर रचनेत त्यांनी कोणताही बदल केलेला नाही. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कररचनेमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. प्राप्तिकराच्या रचनेत बदल होणा नसल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्यामुळे करदात्यांसाठी परिस्थिती जैसे थेच असेल.करदात्यांना महागाईच्या काळात यंदाच्या अंतरिम बजेटमध्ये फारसा दिलासा देण्यात आलेला नाहीय. करोडो करदात्यांना आयकराच्या स्लॅबमध्ये, विविध गुंतवणुकीच्या लिमिटमध्ये बदल करण्याची अपेक्षा होती. परंतु, यात काहीही बदल करण्यात आलेला नाहीय. 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही, अशी घोषणा सीतारमन यांनी केली आहे.