अदानींच्या सिमेंट, स्टीलचे भाव ते दूध, कांदा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा, ओमराजेंचं संसदेत भाषण गाजलं!
1371 views
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब कराठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसेदत जबरदस्त भाषण केलं.यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी कांदा उत्पादक शेतकरी, दूध आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला.यावेळी बोलताना ते म्हणाले, अदानींच्या सिमेंटच्या पोत्याला २०० रुपये होता, तो ४०० रुपये झाला.तिथे का सरकार निर्बंध आणत नाही?, व्यावसायिकांच्या मालाला भाव पण शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही.केंद्र सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत आहे, असंही ते यावेळी म्हणाले.शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नसेल, तर सगळ्या गोष्टी ठप्प होतात.मोठे प्रकल्प टोल मिळतायंत म्हणून तुम्ही करताय, पण दृष्काळग्रस्त भागाकडे बघा.किमान एखादी श्वेतपत्रिका ईडी वर आणा, एखादा नमुना म्हणून तरी भाजपच्या एखाद्या नेत्यावर ईडीची कारवाई करा.यावेळी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला.