इस्रायलहून २१२ भारतीय नागरिकांना घेऊन पहिले विमान दिल्ली विमानतळावर उतरले!
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
हमाससोबतच्या युद्धादरम्यान इस्रायलच्या विविध शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी भारत सरकारने 'ऑपरेशन अजय' सुरू केले आहे. या ऑपरेशन अंतर्गत इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावरून २१२ भारतीयांना घेऊन पहिले विमान दिल्लीला पोहोचले आहे. इस्रायलच्या वेळेनुसार भारतीय नागरिकांनी बेन गुरियन विमानतळावरून रात्री ९ वाजता उड्डाण केले. या फ्लाइटमध्ये २१२ प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचे विमान आज सकाळी ६ वाजता दिल्लीला पोहोचले. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिल्ली विमानतळावर भारतीय नागरिकांचे स्वागत केले.