भलतीच फजिती! ज्याच्या विरोधात राहुल गांधींची सभा, त्याच उमेदवाराचा काँग्रेसच्या बॅनरवर फोटो
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर देशभरात प्रचाराचा धुराळा उडतोय...सभा, दौरे, भाषणांना ऊत आलाय...अन् या प्रचाराच्या धामधुमीत अनेकदा मोठ्या गडबडीत होतात...पण मध्य प्रदेशात काँग्रेसने घातलेला घोळ या सगळ्याही वरचढ आहे. मध्य प्रदेशातील मंडला येथे काँग्रेस नेते राहुल गांधी ज्या उमेदवाराच्या विरोधात मतं मागायला सभा घेणार होते, त्याच विरोधी उमेदवाराचा फोटो काँग्रेसच्या बॅनरवर झळकला अन् पक्षावर हसावं की रडावं अशी परिस्थिती आली. मध्य प्रदेशात काँग्रेसच्या मंचावर लावण्यात बॅनरवर मंडला मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री फग्गनसिंग कुलस्तेंचा फोटो लावण्यात आला. प्रियंका गांधींच्या फोटो खालीच या विरोधी उमेदवाराचा फोटो दिसला अन् चर्चेचा विषय ठरला. खुद्द राहुल गांधींच्या उपस्थित होणाऱ्या सभेत एक चुकीमुळे नामुष्की ओढावलेल्या काँग्रेसला त्या भाजप उमेदवाराच्या फोटोवर दुसराच फोटो लावून सारवासारवही करावी लागली.