राज्यसभेत रजनी पाटलांची बॉलिवूडवर चर्चा; व्यासपीठावर जया बच्चन, भाषणा दरम्यानच्या टायमिंगची चर्चा!
1158 views
national चे व्हिडिओ सबस्क्राईब करा'नारी शक्ती वंदन विधेयक' लोकसभेत मंजूर झालं आहे. संसद अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरू झाली.राज्यसभेत महिला आरक्षणावर काँग्रेस खासदार रजनी पाटील यांनीही भाष्य केलं. यावेळी त्या म्हणाल्या, बॉलिवूडच्या महिला संसदेत चित्रपटाचं प्रमोशन करु लागल्या आहेत. त्यांच्या इथे येण्याबद्दल आक्षेप नाहीय, पण त्यांना केंद्रीय मंत्री पुष्पगुच्छ देतायत.त्यांनी कधी मणिपूरमधल्या महिलांना जाऊन ही सद्भावना दाखवावी, असं रजनी पाटील म्हणाल्या.त्याचवेळी व्यासपीठावर पिठासीन अध्यक्ष जया बच्चन यांची एन्ट्री झाली. त्या हात वर करुन म्हणाल्या, 'हे काय?' हातवारे करुन जया बच्चन निषेध नोंदवत होत्या. त्यावर जया बच्चन म्हणाल्या, मी आत्ता चेअरवर आहे, त्यामुळे काही बोलत नाही. नंतर रजनीताईंनी आपलं भाषण संपवताना एक मिनिट मराठीमध्ये बोलण्यासाठी विनवणी केली. 'आमच्याकडे आज गणपती, गौरी आहेत.. मला शुभेच्छा द्यायच्या आहेत', असं रजनीताई म्हणाल्या.त्यावेळी स्त्री शक्तीचं कौतुक करत जया बच्चन म्हणाल्या, 'तुम्ही महालक्ष्मी आहात...!'.