बहुमत चाचणी पूर्वी राजदचे आमदार तेजस्वी यादवांच्या बंगल्यावर, फोनला मनाई; तेजस्वी यादव बाजी उलटवणार?
1027 views
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब करा१२ फेब्रुवारी हा दिवस बिहारसाठी महत्वाचा ठरणार आहे. कारण याच दिवशी बिहार विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. १७ महिने एकत्र राहिल्यानंतर नितीश कुमार महाआघाडी सोडून पुन्हा एकदा एनडीएमध्ये सामील झाले आहेत. त्यानंतर २८ जानेवारीला नितीश कुमार यांनी बिहारचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत बहुमताचा आकडा १२२ आहे. सरकार स्थापन करण्यासाठी १२२ आमदारांचा पाठिंबा लागणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी आमदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बहुमत चाचणीपूर्वी राष्ट्रीय जनता दल आपल्या आमदारांवर लक्ष ठेवून आहे. यासाठी तेजस्वी यादव यांनी सर्व आमदारांना त्यांच्या घरी ठेवले आहे. सर्व आमदार त्यांच्या निवासस्थानी मुक्कामी आहेत.