विज्ञानानेही हात टेकल्यानंतर ड्रिलिंग तज्ञांनीही देवाचा धावा केला
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
उत्तराखंडमधील उत्तरकाशी सिलक्यारा येथे बोगदा कोसळल्यामुळे ४१ मजूर अडकले होते. ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी १७ दिवसांपासून बचावकार्य सुरू आहे. गेल्या १७ दिवसांपासून अनेक अडथळ्यांचा सामना यासाठी करावा लागला. सध्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी मॅन्युअल आणि व्हर्टिकल ड्रिलिंग अशा वेगवेगळ्या मार्गांनी या मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र बचाव करताना एकामागून एक समस्या समोर उभ्या ठाकत होत्या. पूर्वी ड्रिलिंगसाठी आणलेले अमेरिकन मशीन बिघडले आणि आज अवकाळी पावसामुळे बचावकार्यात अडथळे येण्याची शक्यता होती. ऑगर मशिनने ड्रीलिंग करताना अडथळे निर्माण झाल्यानंतर काल रात्रीपासून मॅन्युअल ड्रिलिंग करण्यात येत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय ड्रिलिंग तज्ञ अर्नोल्ड डिक्स हे देखील तिथे उपस्थित होते. डिक्स यांनी सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या श्रमिकांच्या सुटकेसाठी प्रार्थना केली. बोगद्या जवळ तयार करण्यात आलेल्या मंदिरात पुजाऱ्या सोबत डिक्स हे पुजा करताना दिसले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यावेळी विज्ञानासोबत अध्यात्माचीही जोड लागते जी कठिण परिस्थितीतही आशेचा किरण दाखवते हेच दिसून आलं.