आधी अपहरण मग जबरदस्ती सात फेरे, व्हायरल व्हिडिओनंतर मुलीचे कुटुंबीय आक्रमक
1120 views
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराजस्थानमधील जैसलमेरमधील सांखला गावातील एका मुलीचे अपहरण करून तिला बळजबरीने पळवून नेल्याची लाजिरवाणी घटना समोर आलीये. मोहनगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ जून रोजी मुलीचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. यामध्ये अपरहरण केलेला व्यक्ती मुलीला उचलून घेऊन सात फेरे घेताना दिसतोय तर त्याच्या सोबत असलेल्यांनी निर्लज्जपणे व्हिडिओ बनवत आहेत. पोलिसात गुन्हा दाखल करूनही मुलीला पळवून नेणाऱ्या गुंडांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेला सात दिवस उलटले तरी मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्यांचा शोध लागलेला नाही. संबंधितांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे