सगळ्या फ्रँचायझींनीही श्वास रोखला, पण काव्या मारन बोली लावत गेली, एकट्या पॅटसाठी अख्खी झोळी रिकामी केली
2399 views
क्रीडा चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकाव्या मारन... ३१ वर्षांची तरुणी जी आयपीएलमध्ये अख्ख्या देशाची क्रश असते आणि आयपीएल लिलावात ९ फ्रँचायझींना नडून दरवर्षी सर्वात महागडा खेळाडू आपल्या ताफ्यात घेते.. काव्या मारनला मैदानावर सेलिब्रेशनची संधी कमीच मिळते, पण आयपीएलच्या लिलावात मात्र ती आवडत्या खेळाडूवर पाण्यासारखा पैसा ओतते आणि त्याला स्वतःच्या संघात घेते.. काव्या मारनने २०२४ च्या आयपीएलसाठी पॅट कमिन्सवर बोली लावली आणि मुंबई इंडियन्स आणि त्यानंतर अखेरपर्यंत नडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुलाही गुडघे टेकायला लावले.. काव्या मारनने स्वतःची सगळी पर्स रिकामी करुन लिलावात ९ फ्रँचायझींना कसा श्वास रोखून धरायला लावला आणि एका खेळाडूसाठी बंगळुरुसोबत कशी शेवटपर्यंत फाईट दिली ते पाहण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा..