कोहलीला भेटण्यासाठी पॅलेस्टाईनचा समर्थक थेट मैदानात घुसला, धक्काबुक्की करून बाहेर काढलं, नेमकं काय घडलं?
1273 views
sports चे व्हिडिओ सबस्क्राईब करा'फ्री पॅलेस्टाईन'चा टी-शर्ट... त्यावर मागे झेंडा... चेहऱ्यावर पॅलेस्टाईनच्या झेंड्याचा मास्क आणि थेट खेळपट्टीवर सुरक्षा रक्षकांचा वेढा ओलांडून हा पोहोचलेला तरुण चर्चेत आलाय... नाव जॉन्सन.... अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कपचा फायनल सामना सुरु आहे. अशातच विश्वचषकाचा अंतिम सामन्याच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. टीम इंडियाने मॅचची चांगली सुरुवात केली पण पहिल्या तीन विकेट्स झटपट गेल्या. त्याचवेळी मैदानात एका पॅलेस्टाईन समर्थकाने थेट मैदानात एन्ट्री केली अन् विराटची भेट घेतली. यावेळी नेमकं काय घडलं? हा तरुण नेमका कोण होता? आणि त्याने विराट कोहलीचीच भेट का घेतली? यामुळे चर्चेत आलेला इस्रायल-हमास संघर्ष नेमका काय आहे? तेच या व्हिडिओत पाहू....