सूर्याची हार्ट ब्रोकन इंस्टा स्टोरी, रोहितला कर्णधार पदावरून हटवलं आणि मुंबईने तासात लाखो चाहते गमावले
2532 views
क्रीडा चे व्हिडिओ सबस्क्राईब करामुंबई इंडियन्सनं कर्णधारपदाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवली आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा मुंबईचं नेतृत्त्व करताना दिसणार नाही. रोहितला कर्णधारपदावरुन हटवण्यात आल्याचं मुंबईचे पाठिराखे आणि विशेषत: रोहित शर्माचे चाहते प्रचंड नाराज आहेत. इन्स्टाग्रामवर हजारो जणांनी मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं आहे. ट्विटरवर सध्या रोहित सॅक्ड आणि शेम ऑन एम आय हे दोन हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतायत. केवळ मुंबई इंडियन्सचे चाहतेच नाहीत तर संघाचा प्रमुख फलंदाज असलेला सूर्यकुमार यादवदेखील संघ व्यवस्थापनाच्या निर्णयामुळे नाराज असल्याचं बोललं जातंय. सूर्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यानं काहीही लिहिलेलं नाही, कोणालाही टॅग केलेलं नाही. सूर्यानं केवळ एक इमोजी पोस्ट केली आहे. सूर्यानं हार्टब्रोकन इमोजीचा वापर केला आहे. सूर्याची पोस्ट आणि स्टोरी रोहितसाठीच असल्याची चर्चा आहे.